PostNames
Loading...
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021- International women's day 60 Quotes,whatsapp status images

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021- International women's day 60 Quotes,whatsapp status images

   “आंतरराष्ट्रीय महिला दिन”म्हणून ओळखले जाणारा दिवस सर्वात सुरवातीला 28 फेब्रुवारी1909 रोजी महिला दिन म्हणून आयोजित करण्यात आला होता.

                   1914 मध्ये 8 मार्च रोजी जर्मनी मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन आयोजित करण्यात आला होता.तेव्हापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन (आयडब्ल्यूडी) दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या हक्काच्या चळवळीचा हा केंद्रबिंदू आहे.

                       जगात आज असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला पुरुषांच्या बरोबर सहभागी होतात. अनेक क्षेत्रांत तर त्या पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली आहेत. तरीही आजही अनेक ठिकाणी त्यांना पुरुषापेक्षा निम्न दर्जाची वागणूक दिली जाते.

                        आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे घडलेल्या प्रगतीवर विचार करणे, बदल घडवून आणणे, दृढनिश्चितीची कृती साजरी करणे होय. आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021 ची theme “Choice to Challenge” अशी आहे.

                         IWD  च्या संकल्पनेला जगभर पसरवण्यासाठी , तसेच अधिक प्रेरणा देण्यासाठी आम्ही  8 मार्च               आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील खास महिलांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आ लो आहोत जे तुम्ही वाचू आणि शेअर करु शकता.


                                        आंतरराष्ट्रीय महिला दिन 2021- International women's day 60 Quotes,whatsapp status images

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
देवी लक्ष्मी आणि सरस्वतीची 

कितीपण पूजा करा, 

नवरात्रीचा अखंड उपवास करा, 

पण घरातील स्त्रीला आदर नाही 

दिला तर सर्व काही व्यर्थ आहे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाआजची स्त्री

पुरुषांच्या बरोबरीने काम करताना

घरच्यांना तितकेच मायेने जपते

सासर आपलसं करताना

माहेरही सांभाळते


                                             International women's day 60 Quotes

मृगाकडे कस्तुरी आहे,फुलांत गंध आहे

सागराकडे अथांगता आहे

माझ्याकडे काय आहे,असं म्हणून रडू नका

अंधाराला जाळणारा,एकसुर्य तुझ्यातही लपला आहे
नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या

प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर

सोबत करणाऱ्या “ती”ला

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
स्त्री म्हणजे एक खडतर वाट….

अश्यक्य ते शक्य करून दाखविणारी

अन्यायाला न्याय मिळवून देणारी

जी बदलेल समाजाची वहिवाट..

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
विविध पातळीवर यशाची

उंच झेप घेणाऱ्या

शेतामध्ये राबून सोनं

पिकवणाऱ्या

माझ्या कष्ट करणाऱ्या 

बहिणींना

जागतिक महिला दिनाच्या

आभाळभर शुभेच्छा


                                            International women's day 60 Quotes


स्त्री एक व्याख्या

कधीही कुणास न समजलेली

कधीही कुणास न उमगलेली

कधीही कुणास न जाणवलेली

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
आदिशक्ती तू ,प्रभूची भक्ती तू

झाशीची राणी तू ,मावळ्यांची भवानी तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू

आजच्या युगाची प्रगती तू

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा

प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे

स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
जन्मा येण्याचं कारण तू

नात्यांमधील गुंफण तू

आजच्या युगाची प्रगती तू

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा


                                       International women's day 60 Quotes

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे

गगन ही ढेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

विश्व ते सारे वसावे

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
रात्री रस्त्यावरून जाणारी प्रत्येक मुलगी

ही संधी नसून जवाबदारी आहे….

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
दुःख असुनही दाखवायचं

नसतं…….

मात्र पाण्याने भरलेल्या

डोळ्यांना पुसत

आणखी हसायचं असतं….

अशा माझ्या भगिनींना

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा                                     

International women's day 60 Quotesस्त्री

सक्षम ती आव्हान झेलायला

अवतार ती आदिशक्तीचा

उमेद तिची स्वच्छंद जगण्याची

मुक्तपणे सुरक्षित वावरण्याची

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
स्त्री जन्म…….

म्हणजे एक स्वाभिमान

एक आत्मविश्वास

जागतिक महिला दिनाच्या

 शुभेच्छा
वेगळीच तिची दृष्टी

वेगळीच तिची मनोवृत्ती

वेगळीच ती सर्वांपरी जिद्दी

ध्येयवादी आणि निष्ठावादी

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली तो

मुक्ताईचा ‘ज्ञानोबा’ झाला….

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो

राधेचा ‘शाम’ झाला….

ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो

सितेचा ‘राम’ झाला….

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्री म्हणजे अडथड्यांवर मात,

स्त्री म्हणजे क्षणाची साथ,

तुझ्या कर्तृत्वला सर्वांचा सलाम

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


                                         International women's day 60 Quotes

आजची स्त्री

नभी झेपावणारी तू पक्षिणी

सक्षम कर्तव्य दक्ष तू गृहिणी

प्रसंगी कडाडणारी तू सौदामिनी

शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिणी

                  सुनेत्रा कुऱ्हाडे

पत्नी घराचा स्वर्ग अथवा

 नर्क दोन्ही करू शकते. 

तू मात्र माझ्या घराचं नंदनवन 

केलंस याबद्दल मी तुझा 

नेहमी कृतज्ञ राहीन. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाजेव्हा तु माझा हात हातात 

घेऊन उभी असतेच मला 

जग जिंकल्याचा भास होतो. 

तुझ्या असण्याने माझं 

अस्तित्व बहरून निघतं. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली

योग्य भुमिका बजावून यशस्वीपणे

आपले कर्तृत्व जगाला दाखवून…

आई,बहीण, पत्नी मुलगी आणि मैत्रीण

अशा विविध रुपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे

उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


                                            International women's day 60 Quotes


स्त्री जातीला ज्ञान देऊनी

साक्षर केल्या भगिनी

असे तिचे वरदान

अशी सावित्री महान

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक

तर कधी धगधगती ज्वाळा..

म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो

चंदेरी सोनेरी उजाळा…

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
समाज परीवर्तनासाठी झटणारी तीच ती स्त्री

परिस्थितीची जाण असणारी तीच ती स्त्री

आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान तीच ती स्त्री

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

शांत ,संयमी, सक्षम स्त्री

परिपूर्णतेच मुर्तीमंत रुप स्त्री

विधात्याची साक्षात प्रतिकृती स्त्री

सुंदर, सक्षम,सुशिल आजची स्त्री

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


                                       International women's day 60 Quotes


कधीतरी उगवेल ती पहाट

बदलेल समाजाची वहिवाट

नसेल कोणी(पुरुष) प्रधान

मिळेल स्त्रीला नित्य सन्मान

                 सुनील पवार
आई तू होतीस म्हणून मी आहे. 

माझ्या अस्तित्वाला तुझ्या 

उपकारांची झालर आहे. 

माझ्या यशाची चमक जेव्हा

 तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा 

मी भरून पावतो.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
मुक्त तू ,स्वतंत्र तू

सक्षम तू ,स्वयंसिद्ध तू…

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाअन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू

आणि तुच आहेस दुर्गा माता

रोमारोमात तुझ्या भरलीये

ममता आणि कणखरता

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

                                          International women's day 60 Quotes

जगभरात आपल्या देशाच नाव प्रगतीच्या

शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना....

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

  एक दिवस तर साजरा कर

स्वतःच्या अस्तित्वाचा तू

घेऊन उंच उंच भरारी

रोशन कर दुनिया सारी

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
 तुझ्या अस्तित्वाला

 नकोस देऊ विझू तू

कर्तृत्वाच्या पेटव मशाली

कर स्वतःला सिद्ध तू

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

मन मंदिरातील असशी तू

एक साधारण देवता

विलक्षण तेजोमय

अशी तुझी अस्मिता

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आयुष्याच्या घरट्या मधुनी

जीवनाचे सूर साधते

माप ओलांडूनी तुझे सारे

माझ्यात सामावून घेते

म्हणूनच कि काय ती स्त्री म्हणवली जाते

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
कर्तृत्व तिचे खूप मोठे

नाव मात्र तिचे खुपच छोटे

कोण आहे ही ती? तीच ती स्त्री…

कुटुंबाचा ताठ कणा तीच ती स्त्री

कुटुंबासाठी सतत कष्ट करत राहणारी तीच ती स्त्री

                        रोहन घाडगे


                                         International women's day 60 Quotes


जर एक पुरुष शिक्षित झाला

तर तो एकटाच शिक्षित होतो

पण

जर एक बाई शिक्षित झाली

तर अवघी पिढी शिक्षित होते

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, 

म्हणून त्यांच्याविषयी बदला 

आता तुमचे विचार

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

जी महिला अन्यायाविरूद्ध 

आवाज उठवते तिच 

खरी सामर्थ्यशाली आहे.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती 

इतकी वेगवान असते की ती 

क्षणात कौतूकातून प्रेमात 

आणि प्रेमातून सुखी वैवाहिक 

जीवनाचा प्रवास करू शकते.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

                                        International women's day 60 Quotes


विधात्याने घडवली सृृृृजनांची सावली

निसर्गाने भेट दिली आणि

घरी आली लेक लाडकी

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
जेव्हा स्त्री स्वतःच स्वतःची मैत्रीण होते 

तेव्हा तिचं आयुष्य सुखकर होतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
एक कणखर स्त्रीच 

दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा 

आत्मविश्वास निर्माण करू शकते.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
चांगली लेडी बॉस असेल तर 

त्या कंपनीचं भविष्य नक्कीच 

उज्वल ठरू शकतं कारण...

पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे नियोजन 

आणि व्यवस्थापन कौशल्य 

नक्कीच जास्त असतं.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

तुम्हाला तुमच्या शत्रुंसमोर उभं राहण्यासाठी 

फार धैर्याची गरज असते. मात्र त्याहून 

जास्त संयम लागतो तुमच्या प्रियजनांसोबत 

उभं राहण्यासाठी - जे. के. रोलिंग
संशय हा एक खूप मोठा शत्रू आहे.

 आपण कोण आहोत आहेत 

आपला जन्म कशासाठी आहे 

हे माहीत असणं गरजेचं आहे

                          - जेनिफर लोपेझ

International women's day 60 Quotes

तिला भिती वाटत नाही

 म्हणून ती खंबीर नाही तर

 ती भयापुढेही नमत नाही

 म्हणून ती शक्तीशाली आहे

                           - अँटिकस
जी महिला आदर्श स्त्री असते 

ती आदर्श पत्नी होऊ शकते,

 महिलांच्या हातात लक्ष्मी नांदते 

                               - प्रेमचंद
स्त्रीवाद महिलांना कणखर 

बनवू शकत नाही कारण 

त्या आधीच कणखर आहेत. 

फक्त लोकांनी महिलांकडे 

पाहण्याचा दृष्टीकोन कणखर 

करण्याची गरज आहे

                         - जी. डी. अडरसन
ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो 

त्या घरात दैन्य व दुःख

 कायम वास करतात

                      - सदगुरू श्री वामनरावघरात आलेल्या सुनांची किंमत

 सोन्यात करायची नसते तर

 त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या 

पावलांने घरात प्रवेश करते

 हे ओळखायचे असते

                    - सदगुरू श्री वामनराव पै
मी यशस्वी आहे कारण मला

आयुष्यात कामे न करण्याची 

कारणे देणं आवडत नाही

                   - फ्लोरेन्स नाईटिंगेल


आपल्या स्वतःच्या अटींवर 

यशाची व्याख्या तयार करा. 

तुमच्या स्वतःच्या नियमांवरच ते मिळवा 

आणि मिळालेल्या आयुष्याबद्दल 

अभिमान बाळगा - अने स्विनीमला जन्म दिलास पण त्याचवेळी 

तुझाही दुसरा जन्म झाला. 

तुझ्या या उपकारांचे पांग 

कसे आणि कधी फेडू... 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
International women's day 60 Quotes
मला जन्म देणाऱ्या आणि 

या सृष्टीला जन्म देणाऱ्या 

अनंत मातांना माझा शाष्टांग नमस्कार…

 जागतिक महिला दिनाच्या 

तुम्हाला मनापासून शुभेच्छा
स्त्री कितीही भित्री असली 

तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा 

असतो तेव्हा ती वाघीण होते. 

म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाआई काय करते पेक्षा 

आई काय काय नाही करत

 हा प्रश्न मला पडतो आणि 

आईच्या संस्कारांची जाणिव होते.

आई तुझे किती उपकार मानू... 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाआई नसेल तर मुलं पोरकी होतात 

पण खूप कमी लोकांना माहीत असेल 

अशा पोरक्या झालेल्या बाळांवरही 

आई सुक्ष्म स्वरूपात कृपेची

 बरसात करतच असते.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याच्यासोबत तुझ्यासारखी 

निर्मळ पत्नी आहे त्याला 

कशाची काय भ्रांत…

तू माझ्या आयुष्यात आहेस 

ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाInternational women's day 60 Quotes

2 comments

Zanducare [CPS] IN