Divyang Day Slogan । जागतिक अपंग दिन घोषणा
जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य । Divyang Day Slogan । जागतिक अपंग दिन घोषणा
जागतिक दिव्यांग दिन :- दिव्यांग/अपंग व्यक्तींचे समाजातील स्थान अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात बरोबरीचे स्थान मिळावे यकरिता समाज प्रबोधन व्हावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रांनी 1992 सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी म्हणून हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून पाळला जातो
जागतिक अपंग दिवस :- अपंग व्यक्तींच्या समस्या समजून घेणे त्यांचा सन्मान करणे त्यांना इतर लोकांप्रमाणे समान हक्क आणि अधिकार देणे आणि कल्याणासाठी समर्थन एकत्रित करणे हा या जागतिक अपंग दिनाचा मुख्य उद्देश आहेजगभरातील अपंग व्यक्तींचे हक्क आणि दृष्टीकोन जागरुकता वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतात
2023 च्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवसाची थीम (IDPD) आहे: "अपंग व्यक्तींसाठी, त्यांच्यासह आणि द्वारे SDGs सोडवण्यासाठी आणि साध्य करण्यासाठी कृतीत एकजूट
Slogan For World Disability Day 2023 :- 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शाळेसाठी, दिव्यांगाच्या विशेष शाळेसाठी, प्रभात फेरी, रॅली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य, Divyang Day Slogan, जागतिक अपंग दिन घोषवाक्य, Slogan For World Disability Day, जागतिक अपंग दिन घोषणा, Jagtik Divyang Day Slogan, जागतिक अपंग दिन घोषणा पुढे दिलेली आहे, नक्कीच आपल्याला त्याचा उपयोग होईल यात शंका नाही.
जागतिक दिव्यांग दिन घोषवाक्य, Divyang Day Slogan
दिव्यांगांच्या प्रश्नांविषयी
सकारात्मक भूमिका घ्या
त्यांना सहानुभूती नको,
आत्मविश्वास द्या
या व्हिल चेआरची आवश्यकता
कोणासही भासू नये….
सर्वजण निरोगी राहोत
हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
आपण जे करू शकतो ते
सर्वकाही तेही करू शकता म्हणूनच त्यांना सहानभुतीची नाही तर, अपुलकीची गरज आहे
सहानुभूती नव्हे
विश्वास दाखवा
कलागुणांना कसलेही बंधन नसते....!
भेदभाव करू नका,
आपण सगळे समान आहोत....!
दिव्यांग तो नाही, ज्योतनाने हरतो
दिव्यांग तो आहे, जो मनाने हरतो
Divyang Day Slogan, जागतिक अपंग दिन घोषवाक्य,
आजचा हा दिवस शारिरीक कमी
असलेल्यांच्या कार्यक्षमतेसाठी
संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.
जागतिक अपंग दिन.
अपंगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोण बदलणे आवश्यक आहे. त्यांना मदत करताना उपकाराचा आव येऊ नये. कर्तव्य व सेवेभावनेतून त्यांच्याकडे समाजाच्या प्रत्येक घटकातील प्रतिनिधींनी बघावे.
तुमच्या संघर्षाकडे आणि जीवनाकडे सकारात्मक पाहण्याच्या दृष्टिकोनातून
सर्वांनाच बळ मिळते.
शारीरिक व मानसिक मर्यादांचा
जिद्दीने संघर्ष करणाऱ्या माझ्या
बांधवांना सलाम
जागतिक अपंग दिन घोषवाक्य, Slogan For World Disability Day,
समाजाला आपल्या कर्तव्यांची
आणि अपंग व्यक्तींच्या हक्कांची
आठवण करून देणारा हा दिवस
आपण जे करू शकतो ते सर्व
काही तेही करू शकतात म्हणूनच
त्यांना सहानुभूती नाही तर
विश्वासाची गरज आहे
अपंग बांधवांचा उद्धार
हाच समाजाचा निर्धार
नीती जेव्हा तुमच्या हातून
काही हिरावून घेते तेव्हा
त्याहीपेक्षा काही मूल्यवान
देण्याकरिता तुमचा हात
रिकामा करीत असते
आयुष्यात शारीरिक अपंगत्वापेक्षा
विचारांचा अपंगत्व
अधिक धोकादायक ठरतं
आपल्या प्रेमाने
आणि समान वागणुकीने
त्यांना मिळेल आधार
माणुसकीचा हात
पुढे करू या
अपंगांना मदत करूया
Slogan For World Disability Day, जागतिक अपंग दिन घोषणा,
समाजातील अपंग बांधवांना
सन्मानाची वागणूक देऊन
त्यांचा आत्मविश्वास वाढवणे
आपले कर्तव्य आहे दुर्दम्य
इच्छाशक्तीच्या बळावर हे
दिव्यांग बांधव यशाची अनेक
अनेक शिखरे पार करत आहेत
चला त्यांना साथ देऊ
एक समतोल समाज घडवू
सहानुभूती नव्हे
विश्वास दाखवा
अपंग व्यक्तींना
नेहमी सहकार्याची
भावना ठेवूया
त्यांच्या जिद्दीला व
इच्छाशक्तीला सलाम
जिद्दीने संघर्ष करणाऱ्या
सर्व दिव्यांग बांधवांना
मनःपूर्वक प्रणाम
दिव्यांग व्यक्तींना
सर्वपरीने सहकार्य करून
सक्षम करण्याचा आजच्या
दिनी संकल्प करूयात
सहानुभूती नव्हे
विश्वास ठेवूया
प्रत्येक दिव्यांगाला
आपुलकीची साथ देऊया
जेव्हा मानवी महत्त्वाकांक्षा
ही एक क्षमता आणि त्यासोबत
चिकाटी आणि धैर्य असते तेव्हा
कोणतेही अपंगत्व तुमच्या
आयुष्यावर आणि कलागुणांवर
मात करू शकत नाही
Jagtik Divyang Day Slogan, जागतिक अपंग दिन घोषणा
हक्क देऊ, संधी देऊ,
दिव्यांगाना प्रोत्साहन देऊ.
दिव्यांगाना देऊ संधी,
वाहील विकासाची नांदी.
सर्वांचा निर्धार,
दिव्यांगाचा स्विकार.
मिळून सारे ग्वाही देऊ,
दिव्यांगाना सक्षम बनवू.
दिव्यांगाचा सन्मान,
हाच आमचा अभिमान.
तुमचा आमचा एकच नारा,
दिव्यांगाना देऊ सहारा.
ऊठ दिव्यांग जागा हो,
समाजाचा धागा हो.
समाजाला जागवू या,
दिव्यांगाना सक्षम बनवूया.
एकासारखं दुसर नसतं
सर्वांना बरोबर घ्यायचं असतं !
दिव्यांग असो, वा अपंग
सगळ्यांनाच पुढे न्यायचं असतं..!
नको बोल सहानुभूतीचे,
शिक्षण द्या दिव्यांगाना हक्काचे..!
दिव्यांगाना समान संधी,
हिच प्रगतीची नांदी...!
सामावेशित शिक्षण आले दारी,
विशेष मुलांची प्रगती भारी.
समग्र शिक्षा अभियानाची निर्मिती,
सामान्य विद्यार्थ्यांसोबत दिव्यांगांची उन्नती !
हातात हात द्या,
विशेष मुलांना साथ द्या.
समाजाला जागवू या,
दिव्यांगांना सक्षम बनवूया.
दया नको संधी द्या !
विशेष गरजाधारक
विद्यार्थ्यांना सामावून घ्या.
डरने की क्या बात है।
हम दिव्यांग के साथ है !
दिव्यांगाचे शिक्षण,
प्रगतीचे लक्षण.
समावेशित शिक्षण,
दिव्यांगाच्या हक्काचे रक्षण.
दिव्यांगाना शिकवू,
समाजात त्यांना टिकवू.
एकमेकांच्या सहकार्यने एकत्र येणार,
दिव्यांगाचे निश्चित कल्याण होणार.
निरक्षरता निर्मूलनाचा एकच उपाय,
सर्वांच्या शिक्षणाशिवाय नाही पर्याय.
दिव्यांगाना साथ दया,
मदतीचा हात द्या.
लगंडा पांगळा म्हणु नका.
दिव्यांगाना हिनवू नका.
एक-दोन-तीन-चार,
दिव्यांग म्हणजे नाही भार,
पाच-सहा-सात-आठ,
अपंगांना दाखवा वाट.
अ-आई, ब-बाबा,
अपंग सुदधा मिळवतात
शिक्षणावर ताबा.
शिक्षणाचा कायदा,
दिव्यांगाच्या शिक्षणाचा वायदा.
शिक्षणाचा अधिकार,
दिव्यांगाचा स्वीकार.
आता मनाशी ठरवा पक्कं,
शिक्षण दिव्यांगाचाही हक्क.
सोडून देऊया वाईट अंधश्रद्धा चालीरीती, दिव्यांगाच्या शिक्षणाला देऊया गती.
दिव्यांगाना देऊ समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
दिव्यांग बांधवांना सन्मानाचा,
समानतेचा हक्क देऊया,
चला, एक समतोल समाज घडवूया..
सहानुभूती नको,
आपुलकी दाखवा.
सहानुभूती नवे विश्वास देऊया,
प्रत्येक दिव्यांगाला
आपुलकीची साथ देऊया.
सहानुभूती नको,
सहकार्य आणि आधार द्या.
मदतीसोबत संधीचा हात ठेवूया,
दिव्यांग बांधवांसाठी
सन्मानाचे स्थान ठेवूया.
बोलता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही 'वाचा' आहे नां !
ऐकता येत नसलं म्हणून काय झालं,
मला ही 'जाणीव' आहे नां!
दिसत नसलं म्हणून काय झालं,
मला ही 'स्पर्श' आहे नां!
बुध्दि नसली म्हणून काय झालं,
मला ही 'समज' आहे नां !
चालता येत नसलं म्हणून काय झालं,
माझ्यातही 'हिम्मत' आहे नां !
दिव्यांग असलो म्हणून काय झालं,
'मी' ही एक 'माणूसचं' आहे नां..
देऊनी त्यांना समान वागणूक,
करूया त्यांच्या भावनांची जपणूक.
0 Comments: