मुलगी झाली अभिनंदन संदेश - Congratulations For Baby Girl In Marathi
मुलगी झाली अभिनंदन संदेश | कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा | Mulgi Zali Abhinandan In Marathi
घरात लक्ष्मीच्या रूपात मुलगी जन्माला आल्यावर आई-वडील, आजी-आजोबा, आजी-आजोबा यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा आनंद आणखीनच वाढतो. आजकाल, नवीन युगात, लोक मोठ्या थाटामाटात मुलीचा जन्म साजरा करतात आणि तिचे घरी भव्य स्वागत करतात. आम्ही तुमच्यासाठी मुलीच्या जन्माबद्दल अभिनंदन संदेशांचा सर्वोत्कृष्ट संग्रह सादर करतो (नवीन मुलीच्या पालकांना शुभेच्छा). मुलगी झाल्याबद्दल हे मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, Congratulations For Baby Girl In Marathi, मुलगी झाली अभिनंदन संदेश, Congratulations For Baby Girl In Marathi, कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा,Kanyaratna Wishes In Marathi, मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा, Wishes For New Born Baby Girl In Marathi,मुलगी झाली अभिनंदन Sms, Baby Girl Sms In Marathi, मुलगी झाली स्टेटस, Mulgi Zali Marathi Sms कॉपी करून, तुम्ही तिला व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम इत्यादीद्वारे मुलीच्या जन्माच्या शुभेच्छा देऊ शकता.
लक्ष्मीच्या पावलाने लेक घरी आली, म्हणजे सगळ्या नातेवाईकांकडून आई-बाबांकडून आणि जिवलगांकडून शुभेच्छा तर हव्याच ना !तर मुलीच्या जन्माचा स्वागत करूया काही रंगतदार मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, Congratulations For Baby Girl In Marathi, मुलगी झाली अभिनंदन संदेश, Best wishes For Baby Girl In Marathi, कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छांसोबत !! खालचे कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा संदेश खास तुमच्या घरी आलेल्या गोंडस परीसाठी
उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा
आपल्या कन्येस उदंड आयुष्य लाभू दे
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, Congratulations For Baby Girl In Marathi
चेहऱ्यावर हसू गालावर खोल खडी
उमलली आहे तुमच्याकडे
छोटीशी नाजूक कळी
आपल्याला मुलगी झाल्याबद्दल
खूप खूप अभिनंदन
ज्या क्षणांची आठवण आणि साठवण
मनाच्या कोपऱ्यात कायमस्वरूपी राहील,
ज्याच्यामुळे इथून पुढचं जगणं आनंदी होईल,
असा मौल्यवान क्षण जीवनात आलाय....
ज्याच्या बोबड्या बोलांनी,चेहऱ्यावरच्या
निरागस हास्याला पाहून डोक्यातले असंख्य विचार
आणि टेन्शन दूर कुठेतरी निघून जातील अन्
त्याच्या नुसत्या आवाजाने संपूर्ण घर निनादून जाईल…
तुझ्या अंगणात आली आहे खरोखरची लक्ष्मी
तुळशीभोवती घिरड्या घालेल, काही दिवसात हि चिऊताई
सगळ्या घरात नुसती तिच्या पैंजणांची छम छम असेल
ती असताना तुझ्या घरात कसलीच उणीव नसेल
लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा !!
मागच्या जन्माचे पुण्य म्हणावे
की अहोभाग्य तुमचे
तुमच्या नशिबी लिहिले देवाने
निखळ हास्य मुलीचे
आज तुझ्या घरी म्हणे लक्ष्मी आली,
देवाने जणू आनंदाची तिजोरी खुली केली !
जगात सखी ही तुझा आरसा असेल,
तू जिथे नसशील तिथे ही पडसावली असेल!
तिचे येणे तुझ्यासाठी नवा जन्म ठरो
तुझ्या या गोंडस परीला शत आयुष्य मिळो
तूझ्या घरी एका गोंडस परिचे आगमन झाले
त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा सखी !!
यशोदेला श्रीकृष्णाचा ध्यास
आई वडील झाल्याबद्दल
अभिनंदन आपले खास
मुलगी झाल्याबद्दल आपले
अभिनंदन आणि आशीर्वाद
Congratulations For Baby Girl In Marathi , मुलगी झाली अभिनंदन संदेश
तिच्या येण्याने आले उधाण आनंदाचे,
मुलगी म्हणजे प्रतीक समृद्धीचे .
जगा आनंद मनमुराद कर सोहळे अपार,
जन्म मुलीचा मित्रा आहे लक्षण भाग्याचे.
कन्यारत्न प्राप्त झाले त्याबद्दल लक्ष लक्ष शुभेच्छा !
आयुष्याची गोड सुरुवात
म्हणजे मुलगी
जगण्याची परिकथा होणं
म्हणजे मुलगी
मुलगी म्हणजे देवा घरची गोड भेट,
चालण्या-बोलण्या ,हसण्यातून हृदयाला भिडते थेट!
माझ्या ओंजळीत हे सुख दिले त्याबद्दल नियतीचे आभार,
तिच्या येण्याने जे सुख मिळाले त्याचा
करतो दोन्ही हातांनी स्वीकार!
नवीन पिल्लूला खूप खूप वेलकम आणि
तिच्या आईला धन्यवाद एका मुलीचा बाबा
होण्याचं भाग्य जिच्यामुळे मिळालं !
तुम्हाला आज कन्यारत्न प्राप्त झाले
तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले
आयुष्यात लेकीचा बाप झाल्याच्या
आनंदाने जे हृदय भरून येतं ते,
कुठल्याच सुखाच्या मापात
मोजता येणार नाही…
प्रत्येक पित्याच एक रत्न असते,
ते म्हणजे रत्नात रत्न कन्यारत्न…
परमेश्वराची एक अनमोल देणगी…
जी आज तुम्हाला मिळाली....
नऊ महिन्यांपासून ज्या दिवसाची
वाट पाहत होतात अखेर तो
शुभ दिवस उजाडलाच
आज तुमच्या जीवनातील खास क्षण
आपल्या कन्येच्या जन्मदिनी
आपले हार्दिक अभिनंदन
तुमच्या अंगणी फुललेल्या छोट्याशा कळीला
सुखाची प्रत्येक सावली लाभो
तिच्या मनातली प्रत्येक इच्छा ओठांवर
येण्याअगोदर पूर्ण होवो
बापाचे मन हळवे होते
मयुराचे पान होते
लेकीच्या सहवासात
आयुष्याचे गाण होते
माझ्या लेकीला म्हणे आज लेक झाली आहे
फार वर्षांपूर्वी माझ्यावर आली होती
ती जबाबदारी तिच्यावर आली आहे
हिच्या रूपानं तू आईचा सुख अनुभव
आई म्हणून पुन्हा या जगाला नवीन
डोळ्यांनी बघ, लेकीचा जन्म तुझ्यासाठी
अनुभवांची तिजोरी ठरो, जितका आनंद
तू मला दिला इतकाच आनंद ही
छोटीशी परी तुझ्या आयुष्यात भरो
या आजी कडून छोट्याशा नातीला
आकाशातल्या तारकां इतकं प्रेम
आणि तिच्या आईला डिंकाचा लाडू सोबत
मुलीच्या जन्माचे खूप खूप अभिनंदन !!
मुलगी झाली अभिनंदन संदेश, Best wishes For Baby Girl In Marathi
इवल्याशा पावलांनी सजवी घरदार
अमूल्य अशी परी आली आहे माझ्या पदरात
मुलगी झाल्याबद्दल आपले
अभिनंदन आणि आशीर्वाद
आपल्या घरातील
नव्या प्रमुख पाहुण्याच्या
आगमनाबद्दल अनंत शुभेच्छा
आपल्याला कन्यारत्न प्राप्त
झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
मुलगी जन्माला येण्यासाठी खरंच भाग्य लागतं
तिचा सांभाळ होणार नाही असं घर देवबाप्पा
तिच्यासाठी कधीच निवडत नसतो
आयुष्याच्या साऱ्या समस्यांना पार करून
तुम्ही लेकीच्या जन्माचा स्वागत कराल हे
माहिती आहे त्याला म्हणून ही जबाबदारी
तुम्हाला दिली आहे दादा आणि वहिनी
दोघांनाही लेकीच्या जन्माबद्दल खूप खूप शुभेच्छा
मावशी म्हणजे अगदी आईसारखी असते
पण फक्त बोलायचं म्हणून तिच्याशी नाळ नसते
तुझ्या घरी ताई कन्यारत्न आले आहे
प्रेमात माझा वाटा असेल तशी जबाबदारीतही
भागीदारी असेल, या छोट्याशा चिमुरडीला
मावशीकडून पहिला पापा आणि गुलाबी
गुलाबाच्या पाकळ्यांसारखी अलगद मिठी
तुला आणि जिजूंना लेकीच्या जन्माबद्दल
खूप खूप शुभेच्छा
कन्या आहे पारस दारातील तुळस
कन्या आहे अस्तित्वाचा कळस
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल
आपले हार्दिक अभिनंदन
अहो भाग्य हे तुमचे
नशिबी लेक दिली
इवल्या पावलानी
सोनपरी आली
कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा,Kanyaratna Wishes In Marathi
सूर्यासारखे प्रखर तेज आणि
चंद्रासारखी शितल काया असो
चमचमणाऱ्या चांदण्यासारखं दीर्घायुष्य असो
आपल्या साऱ्यांच्या आयुष्यात आलेल्या
या नाजूक सोनपाकळीला भरपूर सारे प्रेम
आणि तुम्हा दोघांना लेकीच्या जन्मासाठी
खूप खूप शुभेच्छा !!
आता घरात फक्त
एकच आनंद असणार
एकच नाद गुणगुणणार
आई वडिलांचे दोघांचेही
मनःपूर्वक अभिनंदन
स्वर्ग हा फिका आहे
या सुखा पुढे
लेक घेऊन आली
आनंदी आनंद चोहीकडे
सुखाची ओंजळ भरली आज धन्य झाली
भाग्य थोर उजळले मला मुलगी झाली
आज पर्यंत घर नुसते घर होते
मुलीच्या येण्याने ते नंदनवन होऊन गेले
तुमच्या परिवाराला देवाने दिलेल्या
अमूल्य भेटीबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
प्रिय मित्रा,
मला पूर्ण विश्वास आहे
ईश्वराने दिलेल्या या सुंदर भेटीचे
आई-वडिलांचे कर्तव्य
तुम्ही यशस्वीपणे पार कराल
मुलीला अनेक आशीर्वाद
लेकीच्या आगमनाची
गोड वार्ताकारणी आली
तुम्हा दोघांचे मनापासून
अभिनंदन आणि मुलीला
अनेक अनेक आशीर्वाद
आता झोपेची वेळ बदलणार
आता तुम्हाला डायपर
बदलावी लागणार मुलगी
झाल्याबद्दल आपले अभिनंदन
आणि अनेक आशीर्वाद
ओठांवर हसू गालावर खळी,
आपल्याकडे उमलली आहे
छोटीशी नाजूक कळी.
मुलीच्या जन्माबद्दल खूप
खूप अभिनंदन !
परिकथा आज माझी
पूर्ण तू केली बाळा
नात माझी आहे
अवघा मायेचा लळा
इवल्या-इवल्या पावलांनी
आमच्या अंगणी आली आहेस
अगदी काही क्षणात साऱ्यांपेक्षा
प्रिय झाली आहेस, उगीच म्हणतात
लोक लेक परक्याच धन
तुला पाहिल्यापासून तर तू
आमच्या हक्काची झाली आहेस
तुझ्या हक्काच्या घरात तुझं खूप खूप स्वागत !!
कन्यारत्न प्राप्त होणे हे
सुख अनुभवणे म्हणजे स्वर्गीय आहे
आपल्या ओंजळीत असलेले हे
नाजूक फुल सदा बहरती राहावे
मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा, Wishes For New Born Baby Girl In Marathi
ज्या घरी कन्या जन्माला आली
त्या घरी लक्ष्मी नांदली
तुमच्या आयुष्यात देवाने
पाठवलेल्या अमूल्य भेटीबद्दल
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
ऋतूंसारखी भरते ती
सुमनासारखी फुलते ती
वंशाचा घट्ट धागा ती
नात्यांची विण ती
निसर्गाची सुंदर निर्मिती
कन्यारत्न झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन
आपल्या कन्येची सदा भरभराट होवो
आपल्या घरात सदा
आनंद द्विगुणित होवो
आई बाबा झाल्याबद्दल अभिनंदन
मुलीला अनेक आशीर्वाद
प्रिय नवीन पालकांनो तुम्हाला कन्या
झाल्याबद्दल अभिनंदन आणि अनेक आशीर्वाद
घरी आलेल्या नवीन छोट्या छोट्या पावलांना
चॉकलेट गोळ्या बिस्किट आणि भरपूर साऱ्या
प्रेमाची भेट देणार आहोत
लक्ष्मीच्या रूपाने आलेल्या समृद्धीच्या संधीचं
आम्ही सोनं करणार आहोत
काका काकू कडून घरी आलेल्या लेकीचा
खूप खूप स्वागत आणि दादा वहिनींना
लेकीच्या जन्माबद्दल शुभेच्छा
तुमच्या इच्छा पूर्ण करणारी
कन्या जन्माला आली
तुमच्या आयुष्यात
आनंदाची लहर आली
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल
अनेक आशीर्वाद हार्दिक अभिनंदन
इटुकले पिटुकले तिचे इवलेसे हात
गोबरे गोबरे तिचे लाल गाल
गोड गोड किती आहेत छान
सर्वांची लाडकी आहे छकुली लहान
घरात आलेल्या नव्या बाहुलीसाठी
तुमचे मनापासून अभिनंदन
तुमच्या घराचे गोकुळ करणार
तुमची राधा तुमच्या घरात बागडणार
कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन
जरी लाख गुलाब लावले
आपल्या अंगणात तरी
खरा सुगंध तर
लेकीच्या जन्मानेच होतो
घरात आपल्याला कन्या
झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
तुझ्या मित्राच्या शुभेच्छा नेहमी तुझ्या
सोबत असतील तुझ्या घरी आलेल्या
नवीन कन्येला माझे खूप खूप आशीर्वाद
आणि तुला लेकीच्या जन्माच्या खूप खूप शुभेच्छा
लेखी असे पुष्प आहे
जे प्रत्येक बागेत नाही फुलत
आपल्याला मुलगी झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन
आगमन नवजात मुलीचे
अभिनंदन आई बाबाचे
अनंत आशीर्वाद व शुभेच्छा
पहिली बेटी असते
धनाची पेटी
आपल्याला कन्यारत्न
झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
सुख माझे गगनात मावेना
कारण आज माझी लक्ष्मी
माझ्या घरी आली
आज माझे मन भरून पावले
जिचे असणे स्वर्गातल्या अप्सरांना लाजवणारे
जिचे असणे आभाळातल्या तारकांना खेळ भासवणारे
जिचे असणे वाळवंटातही चिंब भिजवणारे
वेळे अगोदर बागेतल्या कळ्यांनाही हसवणारे
अशा लेकीचं आगमन तुमच्या घरी झालं
खरंच भाग्यवान आहात लेकीच्या
जन्माबद्दल खूप खूप अभिनंदन आणि
या नव्या जीवाला पृथ्वीतलावर सारं काही
मिळो ह्या सदिच्छा
Congratulations For Baby Girl
आम्हाला आशा आहे कि मुलगी झाली अभिनंदन संदेश मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा, Congratulations For Baby Girl In Marathii आपल्याला आवडले असतील तर कमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मराठी शुभेच्छा संदेश कन्यारत्न प्राप्त झाले शुभेच्छा,Kanyaratna Wishes In Marathi, मुलगी झाली अभिनंदन शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर बेयर करायला विसरू नका.
तुमच्याजवळ अजून जागतिक कन्या दिन Girl quotes in marathi) शुभेच्छा संदेश मराठी Marathi status for girl), कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Marathi wishes for new born baby} संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट कटा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.
0 Comments: