बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा - Buddha purnima quotes ,wishes in marathi
Buddha purnima quotes in marathi | buddha purnima wishes in marathi | बुद्ध पौर्णिमा मराठी कोट्स | बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा | बुद्ध यांचे मराठी उपदेश | Buddha quotes in marathi | Buddha purnimechya hardik shubhechha
बुद्ध जयंती निमित्त भगवान बुघ्दांचे अमूल्य विचार मराठी मध्ये घेऊन आलो आहे .गौतम बुध्दांचा जन्म नेपाळ मधील लुंबिनी येथे झाला होता, म्हणून नेपाळमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
बुद्ध पौर्णिमा हा सण वैशाखाच्या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच हिंदी महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात साजरा केला जातो,म्हणून याला वैशाख देखील म्हणतात.विशेषतः हा सण बौद्ध धर्मामध्ये प्रचलित आहे, भगवान गौतम बुध्दांचा जन्म याच दिवशी झाला आणि याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती देखील झाली, म्हणजेच ते सिध्दार्थ न राहता गौतम बुद्ध झाले होते.
भगवान बुद्धाचे अनुयायी त्यांच्या देवाच्या जयंतीनिमित्त विशेष प्रार्थना आणि पूजा करून ते साजरे करतात, भगवान बुध्दांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मौल्यवान उपदेश दिले आणि याच शिकवणीचे पालन बौद्ध धर्माचे अनुयायी बोधवाक्य म्हणून करतात. बौद्ध पौर्णिमा हा बौद्ध अनुयायांसाठी एक खास सण आहे.
इतिहास करांच्या मते, बुध्दांचे जीवनकाळ इ.पू.563 - 483 मध्ये गृहीत धरले जाते.बुद्ध पौर्णिमेच्या या खास प्रसंगी आम्ही तुमच्या साठी याच भगवान बुध्दांचे प्रेरणादायी विचार घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन बदलू शकाल.
Buddha purnima quotes in marathi , buddha purnima wishes in marathi , बुद्ध पौर्णिमा मराठी कोट्स , बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा , बुद्धांचे मराठी उपदेश , मराठीत बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा , Buddha quotes in marathi , बुद्धांचे प्रेरणादायी मराठी उपदेश , Buddha Inspirational quotes in marathi , Buddha purnima 2023 wishes in marathi , बुद्ध पौर्णिमा 2023 मराठी शुभेच्छा , Buddha purnima 2023 quotes in marathi . Buddha purnimechya hardik shubhechha
🍁बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁
buddha purnima wishes in marathi | बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा |
🍁एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁
🍁धम्म प्रसारक महान भगवान गौतम
बुद्धांच्या जन्मदिनाच्या तुम्हाला व
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा🍁
🍁बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🍁
🍁गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त
बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास
खूप खूप शुभेच्छा🍁
🍁ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁
🍁बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त
गौतम बुध्दांच्या स्मृतीस
त्रिवार वंदन…
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁
🍁भूतकाळात राहू नका
भविष्याचे स्वप्न पाहू नका
सध्याच्या क्षणी मनावर लक्ष
केंद्रित करा
Happy Buddha purnima🍁
प्रत्येकाने आज प्रयत्नपूर्वक पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करणं गरजेचं आहे निसर्ग आणि पर्यावरणाबद्दल जागरूक होण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन शुभेच्छा
🍁बुद्ध पौर्णिमेची रात्र आज आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधकार दूर करेल आणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्या मार्गाकडे घेऊन जावो
तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🍁
🍁भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती
आणि सत्याच्या मार्गावर ज्ञान देतील
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🍁
Buddha purnima 2023 wishes in marathi | बुद्ध पौर्णिमा 2023 मराठी शुभेच्छा
🍁बुद्ध विचार आहे , दुराचार नाही
बुद्ध शांती आहे , हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे , युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे , थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁
🍁बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील
अज्ञान ,अंधकार दूर करेल आणि
तुम्हाला शांती आणि ज्ञान मार्गाकडे
घेऊन जाईल
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁
🍁मन नेहमी शुद्ध ठेवा
प्रत्येकाला प्रेमाने बघा
बुद्ध पौर्णिमा आनंदाने साजरी करा🍁
🍁तुमचा शत्रु जितकी इजा करत नाही
त्यापेक्षा जास्त इजा
नकारात्मक विचार करतात🍁
🍁बुद्धांच्या ध्यानात मग्न व्हा
होईल प्रत्येकाच्या ह्रुदयात
भगवान बुध्दांचा वास म्हणूनच
हि बुद्ध पौर्णिमा आहे खास
Happy buddha purnima🍁
बुद्ध यांचे मराठी उपदेश | मराठीत बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा | Buddha quotes in marathi
🍁वेळ आली आहे शांतीची
आला आहे प्रेमाचा सण
ज्यांनी जगाला शिकवले
शांती आणि प्रेम
अशा भगवान बुद्धास माझे नमन
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा🍁
🍁प्रेमभाव आणि शांती हिच आहे
भगवान बुघ्दांची दिशा
आजच्या ह्या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशालीची आशा
बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🍁
🍁सर्वांना साथ देत रहा
चांगले विचार ठेवा ,चांगले बोला
प्रेमाची धारा बनून रहा
आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या
मनःपूर्वक शुभेच्छा🍁
🍁बुद्ध पौर्णिमेच्या अनेकानेक शुभेच्छा
चला आपण सर्व मिळून भगवान बुद्धांनी
सांगितलेल्या प्रेम , शांती आणि
सत्याच्या मार्गावर प्रबुध्द होवूया
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🍁
🍁क्रोधाला प्रेमाने ,पापाला सदाचाराने
लोभाला दानाने , आणि असत्याला सत्याने
नक्की जिंकता येते🍁
बुद्ध पौर्णिमा मराठी कोट्स | Buddha purnima quotes in marathi
🍁जीवनात जर हजारो लढाया जिंकण्यापेक्षा
स्वतःवर विजय प्राप्त करा
मग विजय नेहमी तुमचाच होईल
मग हा विजय तुमच्या कडून कोणीही
हिरावून घेऊ शकत नाही🍁
🍁कोणतीही गोष्ट देण्यामध्ये
काय सामर्थ्य आहे
हे तुम्हाला जर कळत असेल
तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण
हे एखाद्या बरोबर वाटून
घेतल्याशिवाय राहू शकत नाही🍁
🍁जीभ हि एखाद्या धारदार सुरी प्रमाणे असते पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात फक्त रक्ताचा सडा घालत नाहीत
इतकाच फरक आहे🍁
🍁तुमच्या कडे वेळ आहे असा जेव्हा
तुम्ही विचार करता तीच तुमच्या
साठी सर्वात मोठी अडचण आहे
कारण वेळ कधी कोणावर कशी येईल
हे कधीच सांगता येत नाही
त्यामुळे जी वेळ आहे त्यांचा व्यवस्थित
उपयोग करून घ्या🍁
🍁जो माणूस मनात उफाळलेल्या क्रोधाला
वेगवान रथाला रोवल्या प्रमाणे आवर घालतो
त्यालाच मी खरा सारथी समजतो
क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ
लगाम हातात ठेवणारा समजला जातो🍁
🍁पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा
विवेक रुपी वृक्षांची छाया
अधिक शीतल असते🍁
बुद्ध यांचे प्रेरणादायी मराठी उपदेश | मराठीत बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा | Buddha Inspirational quotes in marathi
🍁शांतता ही नेहमी
मनातून येत असते
त्याचा कुठेही बाहेर शोध
घ्यायला गेलात तर
ती मिळणार नाही🍁
🍁आदर हा आरशाप्रमाणे असतो
जितका तुम्ही अधिक दाखवाल
तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल🍁
🍁केवळ कल्पना म्हणून अस्तित्वात
असलेल्या कल्पनांपेक्षा ती
विकसित आणि कर्यान्वित
केलेली कल्पना अधिक महत्वाची आहे🍁
🍁जीवनात कोणत्याही उद्देश किंवा
लक्षापर्यंत पोहचण्यापेक्षा
तो प्रवास चांगल्या पध्दतीने करणं
हे महत्वपूर्ण आहे🍁
🍁वाईटात वाईट वर कधीही मात
करता येत नाही
तिरस्काराला केवळ प्रेमाने संपवलं
जाऊ शकतं🍁
🍁सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्ती
केवळ दोन चूका करू शकतात
पहिली चूक म्हणजे संपूर्ण मार्ग
न निवडणे आणि दूसरी म्हणजे
सुरुवातच न करणे🍁
🍁भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका
भुतकाळात गुंतू नका फक्त
वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा
जीवनात खूष राहण्याचा हा एकमेव
योग्य मार्ग आहे🍁
🍁ज्याप्रमाणे एका दिव्याच्या माध्यमातून
हजारो दिवे प्रज्वलित करता येतात
तरीही त्या दिव्याचा प्रकाश कमी होत नाही
त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने तो नेहमी
वाढतो कधीही कमी होत नाही🍁
🍁नेहमी रागात राहणं ,म्हणजे जळलेल्या कोळशाला दुसऱ्या व्यक्तीवर फेकण्याच्या इच्छेने पकडून ठेवण्या समान आहे हा राग सर्वात आधी तुम्हाला भस्मसात करतो🍁
🍁रागामध्ये हजारो चुकीच्या शब्दांचा
वापर करण्यापेक्षा
मौन या एका गोष्टी मुळे जीवनात
शांती निर्माण होते🍁
🍁भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात
दयाशील वृत्तीचा मनुष्य
निर्भय पणाने राहू शकतो🍁
🍁ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे
त्याला माणसं सोडून जाण्याचं
अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे🍁
🍁सत्याची साथ सदैव देत राहा
चांगले बोला चांगले वागा
प्रेमाचा झरा ह्रदयात स्फूरत ठेवा🍁
🍁वाईटाने वाईटाचा नाश कधीच होत नाही
तिरस्कार फक्त प्रेमानेच संपवता येतो
हेच एक अतूट सत्य आहे🍁
बुद्ध यांचे मराठी उपदेश | मराठीत बुध्दांचे संदेश | Buddha quotes in marathi
🍁जगात तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत
आपण किती प्रेम केले
आपण किती शांतपणे जगलो आणि
आपण किती उदारपणे क्षमा केली🍁
🍁क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते🍁
🍁राग कवटाळून बसणे म्हणजे
स्वतः विष पिऊन
समोरच्या व्यक्तीच्या मरणाची
वाट पाहण्यांसमान आहे🍁
🍁सुख मिळवण्याचा कोणताच रस्ता नाही
त्यापेक्षा आनंदी राहणे हाच
सुखी रहण्याचा एकमेव रस्ता आहे🍁
🍁बोलण्याआधी ऐका
खर्च करण्या आधी कमवा
लिहण्या आधी विचार करा
सोडण्या आधी प्रयत्न करा
मरण्याआधी जगा🍁
🍁जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपण
सत्य आणि शांती पासून दूर जातो
कारण रागावलेला माणूस फक्त
स्वतःच्या अहंकाराचा विचार करत असतो🍁
🍁जो बोलतांना आणि काम करतांना
शांत असतो तो असा माणूस आहे
ज्याने सत्य जाणलं आणि जो
सर्व दुःखापासून मुक्त झाला🍁
🍁असत्याचे कोणतेही भविष्य नाही
त्यामुळे तुमचा आज सुखकारक असेल
पण भविष्य नक्कीच नाही🍁
बुद्ध पौर्णिमा मराठी शुभेच्छा | buddha purnima wishes in marathi
🍁तुमच्याकडे जे आहे ते वाढवून चढवून
सांगू नका ,इतरांचा व्देष करू नका
कारण इतरांचा व्देष मत्सर करणाऱ्या
व्यक्तीला कधीच शांती मिळत नाही🍁
🍁तुम्ही जर इतरांच्या आयुष्यात
दिवा लावला तर
तुमचे मार्ग प्रकाशाने भरून जातील🍁
🍁हजारो शत्रूंवर विजय प्राप्त
करणे सोपे आहे
परंतु जो स्वतःवर विजय मिळवतो
तोच खरा विजयी होय🍁
🍁अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे
दया , क्षमा , शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध पौर्णिमेच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा🍁
हेही वाचा :- लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Quotes , wishes in Marathi
Mahiti avadali..Dhanyavaad..
ReplyDeleteMazyahi Blogla ekdaa Jarur bhet dya..
www.ojaslekh.in